मुरबाडमध्ये शाळकरी विद्यार्थ्याची कोयत्याने निर्घृण हत्या
सूरज हा नेहमी प्रमाणे शाळेत गेला होता, याचवेळी एक अनोळखी इसमाने त्याला शाळेतून बोलावून बाहेर नेले. शाळेच्या शेजारी एक इमारतीचे बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी सूरजला नेऊन त्याच्या तोंडावर, मानेवर आणि कमरेवर वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुरजला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. हा प्रकार समजताच शेकडो नागरिक सरकारी रुग्णालयासमोर जमा झाले होते. मरेकऱ्याला त्वरित अटक करा आणि भर चौकात फाशी दया अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेने मुरबाड शहरात खळबळ उडाली असून, शाळेतील शिक्षक आणि विध्यार्थ्याना धक्का बसलाय. तर पोलीसही चक्रावून गेले आहेत. सुरजचे आई वडील हे शेतकरी आहेत. या प्रकरणी मुरबाड पोलीस तपास करीत आहेत.
Hits: 38