“मुम्बई आसपास” क्राइम संक्षीप्त वृत्त

श्रीराम कांदु 
ब्युटी पार्लर मधून महिलेची पर्स लंपास
कल्याण : ब्युटी पार्लर मध्ये आलेल्या महिलेचे मेकअप करत असताना ब्युटी पार्लर मालकिणीची पर्स अज्ञात महिलांनी ब्युटी पार्लर मधून लंपास केल्याची घटना घडली आहे /या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
कल्याण पश्चिमेकडील आग्रा रोड संध्याराग सोसायटी मध्ये राहणाऱ्या वर्षा गीध या महिलेचे कल्याण पूर्व तिसगाव परिसरातील श्रीहरी अपार्टमेंट मध्ये सन वर्ष नावाने ब्युटी पार्लर आहे .बुधवारी दुपारी त्या आपल्या पार्लर मध्ये मेकअप चे काम करत असताना चार अनोळखी महिला त्याच्या पार्लर मध्ये मेकअप करण्याच्या बहाण्याने आल्या .गीध कामात व्यस्त असल्याची संधी साधत अज्ञात महिलांनी गीध यांची दागिन व रोख रक्कम असा मिळून एकूण २९ हजार ५०० रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरून तेथून काढला पाय घेतला .काही वेळाने त्यांना आपली चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी काल कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात महिला विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे .
बनावट दागिने गहान ठेवत फायनान्स कंपनीला ५३ हजारांचा गंडा
कल्याण :  बनावट दागिने सोण्याचे असल्याचे भासवून ते तारण ठेवत भामट्याने एका फायनान्स कंपनीला तब्बल ५३ हजारांना गंडा घातला आहे .सदर बाब निदर्शनास येताच या कंपनीच्या कर्मचार्याने कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे .
कल्याण पूर्वेकडील काटेमानवली नाका येथील सुदर्शन सोसायटी मध्ये इंडिया इन्फोलाईन फायनन्स लिमिटेड या कंपनीचे कार्यालय आहे .कल्याण नजीक असलेल्या उसाटणे येथे राहणाऱ्या मुस्तुखीम सय्यद याने जुलै २०१७ मध्ये या कंपनीकडे बनावट असलेली चैन आणून ती सोन्याचे असल्याचे भासवून कंपनीकडे तारण ठेवत त्या मोबदल्यात कंपनीकडून ५३ हजार रुपये घेत .हि चैन बनावट असल्याचे लक्षात आल्या नंतर कंपनीच्या कर्मचार्याने मुस्तुखीम विरोधात कोल्शेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
पैसे न दिल्याने बांधकाम व्यवसायिकाला मारहाण
कल्याण : कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली येथे राहणारे अंकुश म्हात्रे हे बांधकाम व्यवसायिक असून काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास याच परिसरात राहणारा मोहन म्हात्रे हा तरून त्यांच्या घरी दारू पिवून आला .त्याने अंकुश यांच्याकडे पैशांची मागणी केली .मात्र अंकुश यांनी नकार दिल्याने संतापलेल्या मोहन याने अंकुश यांना शिवीगाळ लाकडी दांडक्याने मारहाण केली.या मारहाणीत अंकुश यांना दुखापत झाले असून त्यांनी या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात मोहन विरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी मोहन म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल केला आहे
चेक वर खोट्या सह्या करत महिलेच्या  बँक खात्यातून लाखोंचा अपहार
कल्याण : जुन्या पत्त्यावर आलेल्या चेक वर सबंधित  महिलेच्या सह्या करत त्याच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख ९० हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर केल्याची घटना कल्याण खडकपाडा येथे उघडकीस आली आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात अली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी पवनकुमार पांडे ,प्रीतेश पारेख ,राजेंद्रसिंग व्ही ,सोलंकी यांच्या विरोधात गुन्हा दाखल त्यांचा शोध सुरु केला आहे .
कल्याण पश्चिमेकडील मोहने येथे राहणार्या महिला प्रिया तिवारी यांच्या  आधी राहत असलेल्या जुन्या पत्त्यावर त्यांच्या बँक खात्याचे चेक बुक आले होते .या संधीचा फायदा घेत पवन कुमार पांडे आणि यांच्या साथीदारांनी या चेक वर प्रिया यांच्या खोट्या सह्या करत त्यांच्या बँक खात्यातील ३ लाख ९० हजार रुपये परस्पर वळते केले .बँक खात्यातून सदर रक्कम ट्रान्सफर झाल्याचे निदर्शनास येताच या महिलेने या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात पवनकुमार पांडे ,प्रीतेश पारेख ,राजेंद्रसिंग व्ही ,सोलंकी यांच्या विरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे
कल्याण डोंबिवलीत घरफोडी
कल्याण : कल्याण पश्चिम वालधुनी येथील अष्टविनायक अपार्टमेंट मध्ये राहणारी सुनीता गुप्ता हि महिला काल सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त बँकेत गेल्या होत्या .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी अवघ्या तासाभरात त्यांच्या घराची कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने मिळून एकूण ७५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या तासाभरात घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे .दुसरी घटना डोंबिवलीत घडली डोंबिवली पूर्व हनुमान नगर येथील याशोज्योती सोसायटी मध्ये राहणारे श्रीकृष्ण जाधव सोमवारी सायंकाळी काही कामानिमित्त दोन दिवसांसाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरचे कुलूप तोडून घरातील ६१ हजार ३०० रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले .मंगळवारी रात्री घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
गाडीच्या काचा फोडून महागडा कारटेप लंपास
कल्याण : कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता मंदिराजवळ छाया निवास एकविरा सावली येथे राहनारे संजय बागुल यांनी आपल्या मालकीची इनोव्हा गाडी काल रात्री याच परिसरात सार्वजनिक रोड लगत उभी केली होती .अज्ञात चोरट्यांनी मध्य रात्रीच्या सुमारास त्याच्या गाडीच्या काचा फोडून गाडीतील महागडा टेप व रोकड असा मिळून एकूण ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास केली सकाळी हि बाब निदर्शनस आल्याने त्यांनी या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे .
बोलण्यात गुंतवनुक महिलेचा लाखोंचा ऐवज लंपास
कल्याण : उल्हासनगर येथे राहणारी निर्मला केदारे हि महिला काल दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौकातून कल्याण  स्टेशनच्या दिशेने जात असताना दोन अनोळखी इसमाने त्यांना हटकले या महिलेला बोलण्यात गुंतवून या महिलेचे लक्ष विचलित करत तिच्या जवळील १ लाख १४ हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेत या दोन भामट्यांनी तेथून पळ काढला .आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर या प्रकरणी या महिलेने महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी दोन अज्ञात इस्माविरोधात गुन्हा नोंद केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email