मुख्यमंत्र्याचा वैचारिक दुष्काळ ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची व्यंगचित्रातून टीका
मुंबई – रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर दौऱ्यावर होते. दरम्यान, विकासकामांसाठी लातूरकरांनी निधीची अजिबात चिंता करु नये, कारण पुढच्यावेळी सुद्धा मीच राज्याचा मुख्यमंत्री असेन, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या त्याच विधानाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर अचूक निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांनी लातूर दौऱ्यावर असताना केलेला दावा हा त्यांचा वैचारिक दुष्काळ असल्याची जळजळीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी मंगळवारी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून हे व्यंगचित्र पोस्ट केलं असून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.
Please follow and like us: