मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने शहापूरमधील ९७ गावे, २५९ पाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

शहापूरची पाणी टंचाई मिटली

ठाणे – धरणांचा तालुका असलेल्या शहापूर तालुक्यातील काही गावे अनके वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सवर अवलंबून होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागातील नागरिकांच्या व्यथांची दाखल घेत भावली धरणातील पाणी जलसंपदा प्रकल्पातून बिगर सिंचन पाणी आरक्षणाच्या प्रस्तावास  आज मंजुरी दिल्याने आता शहापूरची ९७ गावे आणि २५९ पाड्यांची पाणी समस्या कायमची मिटणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापूर येथील कुणबी महोत्सवात पाण्यासंदर्भातील लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन गुरुत्वाकर्षण पद्धतीने भावली धरणाचे पाणी आणण्यासंदर्भात त्वरित निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. जो तालुका संपूर्ण मुंबईला पाणी पुरवतो त्यालाच पाणी नाही असे विदारक चित्र पाहिल्यावर मुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका घेवून याबाबत आज शासन निर्णय काढून हा प्रश्न मार्गी लावला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार कपिल पाटील, स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा यांनी देखील यासंदर्भात वारंवार आवाज उठविला होता.

विवेक भीमनवार यांनी मुख्य कार्यकारी पदाची सूत्रे हाती घेताच शहापूर भागाचा दौरा करून या भागातील पाणी टंचाईविषयी जाणून घेतलले होते. तसेच  वारंवार मंत्रालयात , जलसंपदा, पाणी पुरवठा तसेच ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला केला. आज यासंदर्भात जल संपदा विभागाने पाणी आरक्षणाच्या निर्णयास शासन निर्णय काढून मान्यता दिल्याने इगतपुरीच्या भावली धरणातून १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी टकरग्रस्त गावांसाठी वाटप केले जाणार आहे.

कसे मिळणार गुरुत्वाकर्षणाने पाणी?

इगतपुरी तालुक्यात भावली दारणा नदीच्या उगमस्थानी हे धरण असून दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता आहे. हे धरण ५९० मीटर उंचीवर असून शहापूर भागातील गावे व पाड्या २२० ते ५४० मीटर इतक्या उंचीवर असल्याने भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाने या गावांना पाणी मिळू शकते. यासाठी विजेचा एक युनिटही खर्च करण्याची आवश्यकता नाही असे विवेक भीमनवार यांनी सांगितले.

विकासाला मिळणार गती

माळ, दांड सारख्या दुर्गम भागातील गावांबरोबर वाशाळ, खर्डी, कसारा, चेरपोली, शहापूर, आसनगाव अशा २ लाख लोकवस्तीच्या गाव आणि पाड्यांना पिण्याचे पाणी मिळणार असून शहापूरचा पाण्याभावी रखडलेला विकास या निर्णयामुळे  होणार असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. 

Please follow and like us:
Pin Share

Hits: 19

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email