मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्स यांची भेट

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्स यांची सॅन फ्रॅन्सिस्को येथे भेट घेतली. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया अभियानाला भक्कम करण्यासाठी ओरॅकलने हाती घेतलेल्या अभियानाचा एक भाग म्हणून ही भेट होती. मुंबईमध्ये अत्याधुनिक डाटा सेंटर्स प्रारंभ करण्याची ओरॅकलची तयारी आहे. त्यासाठी आवश्यक गुंतवणूक प्रस्तावांसाठी मुख्यमंत्र्यांनी गती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. ओरॅकलला आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. जनसामान्यांना अधिक चांगल्याप्रकारे सेवांचे प्रदान करण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर शासकीय माहितीच्या संदर्भात करता यावा, या हेतूने एक संयुक्त गट स्थापन करण्याबाबत सुद्धा यावेळी सहमती झाली. आर्टिफिशियल इंटिलिजन्स, फिनटेक, क्लाऊड कम्प्युटिंग इत्यादींसंदर्भातही यावेळी सविस्तर चर्चा झाली. नागरिकांना अनेक प्रकारची माहिती घेऊन अनेक कामांसाठी विविध शासकीय विभागांकडे जावे लागते. यापासून त्यांना दिलासा देण्यासाठी प्रणाली विकसित करण्यासंदर्भात सुद्धा ओरॅकलसोबत राज्य सरकार काम करणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email