मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि सांगली निकालांवर दिलेली प्रतिक्रिया

जळगाव आणि सांगली या दोन्ही महापालिका निवडणुकीत भाजपावर प्रचंड विश्वास दाखविल्याबद्दल या दोन्ही शहरांमधील नागरिकांचे आपण मन:पूर्वक आभार मानतो. जनतेच्या मनात काय आहे, हा कौल त्यांनी स्पष्टपणे या निकालातून दिला आहे, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात सुरू झालेल्या विकास आणि विश्वासाच्या राजकारणाला, राज्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी पसंती दिली आहे. राज्य सरकारने हाती घेतलेले कार्यक्रम आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वातील सरकारवर जनतेने दाखविलेला हा फार मोठा विश्वास आहे. राज्यात प्रश्न अनेक आहेत. पण, या सर्व मागण्या गेल्या 40-50 वर्षांपासूनच्या प्रलंबित आहेत आणि त्या प्रत्येक मागण्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सरकार करते आहे, हेही जनतेला ठावूक आहे.

त्यामुळेच जनतेने हा कौल भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. जनतेचा हा कौल आम्ही अतिशय विनम्रतेने स्वीकारतो. राज्यात विविध समाजांचे, विकासाचे, आरक्षणाचे, रोजगाराचे प्रश्न आहेत, ते सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न सरकार करतेच आहे. पण, या जनादेशाने आम्हाला भक्कम पाठबळ दिले आहे. या दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री आणि आमच्या सर्व नेत्यांनी केलेल्या परिश्रमाचा हा विजय आहे. याबद्दल मी त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email