मुंबई महापालिकेतील सफाई कामगार भरतीला स्थगिती द्या आमदार विजय (भाई) गिरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तातडीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

(म.विजय)

मुंबई महापालिकेने सफाई कामगारांच्या भरती परीक्षेत अत्यंत कठीण प्रश्न विचारून जी भरती केली ती अन्यायकारक असून बहुजन वर्गाच्या उमेदवारांना भरतीपासून दूर ठेवले आहे. हि भरती तातडीने रद्द करण्यात यावी अशी मागणी आमदार विजय (भाई) गिरकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले.

मुंबई महानगरपालिकेने 1388 जागांसाठी नुकतीच सफाई कामगार भरती केली यामध्ये दहावी पास उमेदवारांना अत्यंत कठीण प्रश्न विचारण्यात आले होते. यावर हरकत घेत हा बहुजन समाजातील उमेदवारांवर केलेला अन्यायाकडे लक्षवेधीत आमदार भाई गिरकर यांनी याची चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेत केली होती. या परीक्षेत असे प्रश्न विचारण्यात आले होते. भारताचे 44 वे सरन्यायाधीश कोण?, 88 नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?, फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुस-या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील पराग कणांच्या होणा-या परागसिंचनास काय म्हणतात?, गायनेशियम म्हणजे काय? असे कठीण प्रश्नविचारले गेले होते. याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंर राज्यातील अनेक भागातील सदर परीक्षा दिलेल्या परीक्षाथींनी  आमदार भाई गिरकर यांच्याशी संपर्क करून हि परीक्षा रद्द करण्याची मागणी केली याची दखल घेत भाई गिरकर यांनी  मुख्‍यमंत्री यांनी ही परीक्षा रद्द करून २००९ सालच्या परीक्षेत प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आलेल्या उमेदवारांची प्राधान्याने भरती करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ही परीक्षा तातडीने रद्द करण्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email