मुंबई मध्ये राहणाऱ्या एका तरुणाला डोंबिवलीत दोन चोरट्यांनी लुटलं.
डोंबिवली – मुंबई मध्ये राहणाऱ्या एका तरुणाला डोंबिवली मध्यील दोन चोरट्यांनी लुटलं. प्रमोद शिंदे (२६) असे या तरुणाचे नाव आहे कामानिमित आलेला हा तरूण पश्चिमेला द्वारका हॉटेलजवळ उभे असतांना ही घटना गटली. प्रमोदला या दोनी चोरट्यांनी सांगितले की पुढील चौकात मारमारी आणि लुटालूट चालू आहे. आमच्या गळ्यातली चैनही हिसकावून घेतली घाबरलेल्या प्रमोदने सोन्याची चेन आणि अंगठी दोन चोरट्यांच्या रुमालात ठेवण्यासाठी दिले. रुमाल बांधाण्याचा बाहाणा करत त्यांनी तिथून पळ काढला. प्रमोदला आपली फसवूणुक झाल्याचे समजताच त्यांने विष्णूनगर पोलिस ठाण्यांत फिर्याद दिली. त्यां आधारे पोलिसानी दोन चोरट्यांन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: