मुंबई कार्यालयांत इग्रंजीचा वापर बंद!
मुंबई : कार्यालयांत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठीचाच वापर करणे असा सक्तीचा आदेश राज्य सरकारने काढलेला आहे. अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रत्येक कार्यालयात मराठीचा पूर्ण पणे वापर झाला पाहिजे. हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेशही दिले आहेत योजनांची माहिती सामान्यांना देताना वा त्याची चर्चा करताना तसेच दूरध्वनीवरून बोलताना मराठीतच बोलावे. असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही ज्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मराठीचा वापर करण्याबाबत सुधारणा होत नाही, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.