मुंबई आग्रा रोडच्या भीषण अपघातातील जखमी मध्ये कल्याणचे भाविक ….

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – कल्याणच्या सुभाष मैदाना लगतच्या परिसरातील अंबे निवास व इंदिरा निवास येथील रुखी समाजाची वसाहतीत राहणारे पालिकेचे सफाई कर्मचारी व त्यांचे नातेवाईक असे वीस ते पंचवीस भाविक टेम्पो ट्रॅव्हलर्स श्रीक्षेत्र उज्जेन येथे देव दर्शनाला गेले होते. देव दर्शन करून  गरुवारी पहाटे कल्याणला परतत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक नजीक चांदवडच्या सोग्रास फाट्या जवळ त्याच्या टेम्पो ट्रॅव्हलर्स व ट्रक यांच्यातील भीषण  अपघात झाला .या अपघातात १० भाविक जागीच ठार झाले असून अन्य भाविक गंभीर जखमी झाल्याची  दुर्दैवी घटना घडली .या दुदैवी घटनेने कल्याणातील रुखी समाजाच्या वस्तीवर  शोककळा पसरली आहे .

        कल्याण पश्चिम सुभाष मैदाना लगतच्या अंबे  निवास इंदिरा निवास येथे रुखी समाजाची वस्ती असून या ठिकाणी पालिकेचे  सफाई कर्मचारी राहतात  .या वसाहतीतील पालिकेचे सफाई कर्मचारी व त्याचे नातेवाईक असे सुमारे २० ते २५ भाविक  सोमवारी चार तारखेला संध्याकाळी कल्याणहून टेम्पो ट्रॅव्हलर्स बस मधून श्री क्षेत्र उजैन येथे देवदर्शन यात्रेला गेले होते.देवदर्शनाहून  गुरुवारी पहाटे घरी परतत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक नजीक चांदवडच्या सोग्रास फाट्या जवळ त्याच्या टेम्पो ट्रॅव्हलर्स व ट्रक यांच्यात भीषण  अपघातात झाला .या दुर्दैवी अपघातात  १० भाविक जागीच ठार झाले असून अन्य भाविक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे  .या अपघात मध्ये या परिसरात राहणारे परमार कुटुंबातील छाया परमार, धनुबाई परमार( ५० ) मंजुळा परमार (३५ ) व आठ वर्षाची चिमुकली प्रगती परमार  व बारा वर्षाची प्रतिज्ञा परमार तर वालोद्रा कुटुंबातील  पानु बेरडीया वालोद्रा,अजय वालोद्रा त्याची पत्नी ,गुंजन वलोद्रा व भाऊ विजय वालोद्रा ,घावरी कुटुंबातील प्रकाश घावरी (३८ ) त्यांची पत्नी जागृती ,मुलगी कशिश (१२ ),निशा (१८) ,मुलगा पवन (८ )तसेच गीता परमार ,किसन चौहान आदी भाविक बस मध्ये  होते.अपघातात मृत्यू मुखी पडलेल्या भाविकांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. या बसच्या अपघाताची  बातमी या वसाहतीत धडकताच या वसाहतीत  दुखाचा डोंगर कोसळला आहे या वस्तीमधील अनेक जण नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email