मुंबईतील चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून आणखी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईतील चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून आणखी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शारदा घोडेस्वार असं मृत्यू महिलेचं नाव आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास कामाला जाण्यासाठी शारदा घोडेस्वार डायमंड गार्डन परिसरातील स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या होत्या. मात्र त्याचवेळी अचानक झाड अंगावर पडून शारदा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शारदा यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान झाड अंगावर पडून महिलेचा मृत्यू होण्याची चेंबूरमधलीच ही दुसरी घटना आहे. याआधी चेंबूरमधील स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ या महिलेचा मृत्यू झाला होता
Please follow and like us: