मुंबईकरांची खड्ड्यांच्या समस्येतून होणार सुटका…

मुंबई – पावसाने दुर्दशा झालेल्या एक हजार 343 रस्त्यांपैकी 250 रस्त्यांची कामे 10 ऑक्‍टोबरपासून महापालिकेने सुरू केली आहेत. ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. त्यामुळे मुंबईकरांची खड्ड्यांच्या समस्येतून सुटका होणार आहे. 

 पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाल्या वर पाऊस सुरू असल्याने त्यांची दुरुस्ती करणेही कठीण झाले होते. पालिकेने शहर, पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांतील 507.62 किमी लांबीच्या रस्त्यांची एक हजार 343 कामे सुरू केली आहेत; त्यात पावसाळ्यामुळे थांबवण्यात आलेल्या 719 आणि नवीन एक हजार 343 रस्त्यांचा तसेच जंक्‍शनच्या दुरुस्ती कामांचा समावेश आहे. 507.62 किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामांसाठी काढलेल्या निविदांमध्ये, 624 रस्त्यांचा समावेश आहे.

या कामांमध्ये शहर भागातील 46.16 किमी लांबीच्या 199 रस्ते कामांचा समावेश आहे, तर पूर्व उपनगरातील 47.89 किमी लांबीच्या 155 रस्त्यांचा आणि पश्‍चिम उपनगरातील 108.26 किमी लांबीच्या 270 रस्त्यांचा समावेश आहे. एक लाख 31 हजार आठ चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाच्या जंक्‍शनची कामेही पालिका करणार आहे. 

जे रस्ते पूर्णपणे नव्याने करण्यात येणार आहेत, अशा रस्त्यांचा समावेश “प्रकल्प रस्ते’ या वर्गवारीत करण्यात येईल. त्याव्यतिरिक्त “प्राधान्यक्रम 2′ या वर्गवारीतील राहिलेल्या 7.71 किमी लांबीच्या रस्त्यांची आणि “प्राधान्यक्रम 3’अंतर्गत 58.92 किमी लांबीच्या रस्त्यांची कामेही हाती घेतली जात आहेत. पूर्ण रस्तेबांधणी करताना वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. 

वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने रस्त्यांची कामे केली जात आहेत. त्यामुळे कामे सुरू असताना वाहतुकीला अडथळा येत नाही. वाहतूक पोलिसांची परवानगी टप्प्याटप्प्याने मिळत आहे. तशी तशी कामे हाती घेतली जात आहेत. त्यामुळे 10 ऑक्‍टोबरपासून सुरू केलेली कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email