मीराबाई चानू यांच्या बातम्यांऐवजी सलमान बातम्या सोशल मिडियावर संताप
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारतीय भारतोलक मीराबाई चानूने भारतासाठी पहिले वहिले सुवर्णपदक मिळवले आहे.देशासाठी ही फारच गौरावाची बाब असूनही प्रसार माध्यमांचे याकडे फारसं लक्ष नव्हतं.मिडिया यावेळी सलमान खान काळवीट प्रकरणाची बातमी दाखवण्यात दंग होता.सोशल मिडीयावर अनेकांनी या गोष्टीकडे लक्ष वेधत प्रसार माध्यमांवर निशाणा साधला.देशासाठी एव्ह्ढी गौरवशाली कामगिरी करणा-या मीराबाई चानू यांच्या बातम्यांऐवजी सारा वेळ सलमान खानच्या बातम्या दिसत असल्याचा संताप व्यक्त करत अनेकांनी विविध पोस्ट शेयर केल्या.
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारतीय भारतोलक मीराबाई चानूने भारतासाठी पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून गोल्डकोस्टचा परिसर भारतीय राष्ट्रगीताने मंत्रमुग्ध झाला असताना प्रसार माध्यमे हे सोडून सलमान खान काळवीट प्रकरणाची बातमी व चर्चा दाखवत आहे, हे देशासाठी कोणती अशी बाब सलमानने केली आहे की त्याचा एवढा उदोउदो सुरू आहे. चानूच्या पदकाची एक लाईन बातमी द्यायला यांच्याकडे जागा नाही, कसे खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आणि कशी क्रीडा संस्कृती तुमच्या देशात तयार होणार?
या प्रकारचे पोस्ट शेयर करत अनेकांनी प्रसार माध्यमांवर निशाणा साधला.