माहिती अधिकार कायद्याचा दुरूपयोग करणा-या तथाकथित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी

माहिती अधिकार कायद्याचा दुरूपयोग करणा-या तथाकथित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमदार प्रताप सरनाईकांची लक्षवेधी

माहिती अधिकार कायद्याचा दुरूपयोग करणा-या तथाकथित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एका लक्षवेधीद्वारे केली आहे. महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळं शहराचा विकास होत असताना दुसरीकडे या विकासकामांबद्दल काही तथाकथित कार्यकर्ते जाणिवपूर्वक माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मागवतात आणि या माहितीच्या आधारे विकासक, ठेकेदार आणि महापालिका अधिका-यांना ब्लॅकमेल करत असल्यामुळं विकासकामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. काही कार्यकर्ते खरोखरच दक्ष नागरिक असले तरी अनेकदा वारंवार माहिती अधिकारात अर्ज करून मिळालेल्या माहितीचा अर्धवटपणे स्वत:च्या मर्जीप्रमाणे अर्थ लावून असंख्य तक्रारी करून संशय निर्माण करतात. त्यानंतर अशी मंडळी अचानकपणे केलेली तक्रार मागे करून महापालिकेनं केलेली कारवाई योग्य असल्याचं सांगतात. त्यामुळं अशा समाजकंटकांवर कारवाई करणं गरजेचं असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. तथाकथित कार्यकर्त्यांच्या खोट्या तक्रारीमुळं प्रशासनाचा वेळ वाया जात असून अशाप्रकारे माहिती अधिकार कायद्याचा दुरूपयोग करून वारंवार खोट्या तक्रारी दाखल करणा-या तथाकथित कार्यकर्त्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनानं लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी या लक्षवेधीद्वारे केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email