माहिती अधिकाराचा  दुरुपयोग करणा-या कार्यकर्त्यांना काळय़ा यादीत टाका :शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी

श्रीराम कांदू 

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने ब्लॅकमेलिंगसाठी माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांना काळय़ा यादीत टाकावे, असा ठराव शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी मांडला असून तो येत्या महासभेत पटलावर येणार आहे. माहिती अधिकाराचा वापर करत नागरी विकासाच्या कार्यात गोंधळ घातला जातोय. माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून जे माहिती अधिकार कार्यकर्ते महपालिका आणि शासकीय यंत्रणांना वेठीस धरत असतील तर त्यांना काळय़ा यादीत टाकण्यात यावे. त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर किंवा अपिलावर सुनावणी घेण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.नवी मुंबई महापालिकेतही अनेक माहिती कार्यकर्ते याप्रकारे वागत असून वारंवार माहिती विचारली जात असल्याने अनेक विकासकार्य रखडली आहेत.या अधिकाराचा दुरुपयोग करून नागरी विकासकामांमध्ये अडचणी निर्माण करणा-या  आणि अधिका-यांना ब्लॅकमेल करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना काळय़ा यादीत टाका, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे करण्यात आली आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email