मालमत्ता कर करण्यासाठी शिवसेना राज्यशासनाकडे करणार पत्रव्यवहार माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिले आश्वासन ….

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने एकीकडे  ओपन  लॅन्ड टॅक्स कमी करण्याचा निर्णय महासभेत घेतला असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जागरूक नागरिक मंचने पालिकेच्या या भूमिकेवर नाराजी व्यकत केली आहे.बिल्डरधार्जिण पालिका असल्याचा आरोप मनसे गटनेते प्रकाश भोईर यांनी केली असताना शिवसेना मात्र यावर मालमत्ता कर करण्यासाठी राज्यशासनाकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे माजी महापौर तथा जेष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी  सांगितले
नवी मुंबई महानगरपालिकेत ७१.५० टक्के, ठाणे महानगरपालिकेत ६१ टक्के, नाशिक महानगरपालिकेत ५४ टक्के आणि पिंपरी महानगरपालिकेत ५३ टक्के तर सर्वात जास्त मालमत्ता कर कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत ७१.५० टक्के इतका आकारला जातो.महासभेत शिवसेना -भाजपने मंजुरी देत ओपन लॅन्ड टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला.मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी यावर मालमत्ता कर कमी न करणाऱ्या पालिकेवर जोरदार टीका केली.तर जागरूक नागरिक मंचने मालमत्ता कर का कमी होत नाही असा प्रश्न पालिका प्रशासनाला विचारला आहे.याबाबत माजी महापौर तथा जेष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी माहिती दिली.मालमत्ता कर १९८३ ते १९९५ या प्रशासकीय कालावधीत ४९  टक्के मालमत्ता कर आकारला जात होता.त्यानंतर १९९५ ते २००५ या कालावधीत शिवसेनेच्या सत्तेत मालमत्ता करात वाढ झाली नाही.मात्र २००५ साली विविध विकास कामासाठी निधी देण्याकरता राज्यशासनाने मालमत्ता कर वाढविण्याची अट ठेवली होती.त्यामळे टप्पाटप्पाने दोन वेळेला असा २२टक्के मालमत्ता कर वाढविला गेला.परंतु आता कामे झाली असून हा कर कमी करण्यासाठी शिवसेना राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
 
 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email