मालगाडीवर फोटो काढताना शॉक लागून डोंबिवलीतील तरुण जखमी
डोंबिवली दि.१८ – मालगाडीवर उभे राहून फोटो काढण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना सोमवारी सकाळी ठाकुर्ली पत्रीपुलाजवळ घडली. जखमी तरुणाला डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ऋषिकेश केळकर असे जखमी तरुणाचे नाव असून तो डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरात राहतो. सोलापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारा ऋषिकेश फोटो काढण्यासाठी मालगाडीच्या टपावर चढला.फोटो काढत असताना मालगाडीवरील ओव्हरहेड वायरचा शॉक लागून ऋषिकेश जमिनीवर पडला. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
Please follow and like us: