माथेफिरूने महिलेसह अन्य एका इसमावर केला चाकूने हल्ला
भांडण पाहणे पडले महागात
डोंबिवली : एका महिलेला भांडण पाहणे चांगलेच महागात पडले. माथेफिरुने या महिलेवर चाकूने हल्ला केला. तसेच यावेळी भांडण सोडवण्यास आलेल्या इसम वर देखील या माथेफिरूने हल्ला करत त्याला जखमी केले आहे .या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार सुंदरम बालसुब्रमण्यम सोनार विरोधात गुन्हा दाखल केला .
कल्याण पूर्वेकडील नेतिवली येथील भोईर चाळीत राहणारी महिला छाया भोईर यांना काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घरा बाहेरून मोठ मोठ्याने भांडणाचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर डोकावले असता समोर राहणाऱ्या सुंदरम सोनार याच्या घरात भांडण सुरु असल्याचे दिसले म्हनून भोईर यांनी घरात डोकावले त्यामूळे संतापलेल्या सोनार याने भोइर यांना शिवीगाळ करत त्यांंच्यावर चाकूने हल्ला केला यावेळी भांडण सोडवण्यास आलेल्या दिलीप राजभर याच्यावर सोनार याने चाकूने हल्ला करत जखमी केले .या प्रकरणी भोईर यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सुंदरम बालसुब्रमण्यम सोनार विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .