माजी शिक्षक,माजी पोलीस पाटील पांडूरंग सदाशिव माने यांचा ९० वा जन्मदिवस संपन्न
माजी शिक्षक,माजी पोलीस पाटील पांडूरंग सदाशिव माने यांचा ९० वा जन्मदिवस
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील लांझा तालुक्यात असणा-या कुरचुंब गावातील माजी शिक्षक व माजी पोलीस पाटील पांडूरंग सदाशिव माने यांचा ९० वा जन्मदिवस ७ एप्रिल रोजी संपन्न झाला.माने हे कुरचुंब गावातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती असून त्यांच्या जन्मदिवसानिमित्त माने कुटुंबीय तसेच त्यांचे हितचिंतक यांच्या वतीने एका विषेश सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.
माने यांनी तरुणपणी शिक्षक म्हणून व त्यानंतर गावाचे पोलीस पाटील म्हणून ग्रामस्थांची सेवा केली.त्याच प्रमाणे वेळोवेळी इतरांना मदत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे गावात त्यांना फारच मानाचे स्थान आहे.याच दिवशी गावातील श्री गांगेश्वर मंदिरात श्री स्वामी समर्थांची पालखी आली होती.सदर भक्तजनांनिही त्यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
माने यांच्या जन्म दिवसानिमित्त सकाळी ८ वाजता होमहवन ,११ वाजता त्यांची साखरतुला,१२ वाजता श्री गांगेश्वर मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळयातील भक्तांतर्फे सत्कार ,व सायंकाळी ५ वाजता माने यांची मिरवणुक काढण्यात आली.घोड्यावरून काढण्यात आलेली ही मिरवणुक पाहण्यासाठी ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती.यावेळी माने यांना अनेक मान्यवरानी शुभेच्छा देत त्यांचे अभिष्ठचिंतन केले.या नंतर ७ वाजता हरिपाठ,त्यानंतर ह.भ.प.हंडे महाराज यांचे कीर्तन व त्यानंतर स्नेह भोजनाने या सोहळयाचा समारोप झाला.