मागवला मोबाईल मिळाली साबणाची वडी

मुंबई – दहावीत असलेल्या सिराज यांच्या मुलीला ८५ टक्के मिळाले म्हणून तिला बक्षीस म्हणून सिराज यांनी तिला १६ हजार ६७५ रूपयांचा शाओमी नोट ५ प्रो ऑनलाईन ऑर्डर केला आणि ऑनलाईन पेमेंट देखील केली. मोबाईल आल्या नंतर जेव्हा त्यांनी बॉक्स खोला तेव्हा बॉक्स मध्ये मोबईलच्या जागी साबणाची वडी निघाली. मोबाईल आणणाऱ्या मुलासा विचारले असता त्याला देखील यासंबधी काही माहिती नव्हती. याप्रकरणी सिराज यांनी ऑनलाईन कंपनी कडे तक्रार केली आहे. या प्रकारांमुळे ऑनलाईन शॉपींगवरचा ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. म्हणूनच ऑनलाईन शॉपींगमधील फसवेगिरीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना आमलात आणण्याची मागणी वाढू लागली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email