मांजरसुंबा घाटात पुन्हा विचित्र अपघात; चार वाहने एकमेकांवर आदळली

नेकनूर – सध्या रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू असल्याने अरुंद रस्ते झाले आहेत यातच मांजरसुबां घाटात उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याने वाहतुकीचा प्रश्न सतत निर्माण होत असतो. अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. घाटात दुपारी विचित्र अपघात घडला. चार वाहने एकमेकांवर आदळली यात स्वीफ्ट मधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य जखमी झाले असल्याचे सांगण्यात येते आहे.हा विचित्र अपघात कंटेनर चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याचे सांगण्यात आले.

नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर आणि महेश आदटराव हे दोघे आपल्या स्विफ्ट गाडीने बीडकडे चालले होते. मांजरसुंबां घाटात दुपारी ट्राफिक जाम झाली होती. गोंदकर यांच्या स्विफ्टच्या पाठीमागे अन्य एक स्विफ्ट होती. ट्राफिक जामदरम्यान पाठीमागून आलेले कंटेनर गोंदकर यांच्या गाडीच्या पाठीमागे असलेल्या स्विफवर धडकले. ती स्विफ्ट गाडी पोलीस कर्मचाऱ्यांच्या गाडीवर धडकली आणि पोलीस कर्मचाऱ्यांची गाडी एसटीला पाठीमागून धडकली. या विचित्र अपघातात गोंदकर, महेश आदटराव त्यांच्यासह अन्य जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email