महेश पाटील प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नागरिक वाढदिवस सोहळा आयोजित

महेश पाटील प्रतिष्ठानतर्फे दर महिन्याच्या अखेरच्या शनिवारी त्या महिन्यात जन्मदिवस असणा-या ज्येष्ठ्य नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो.महेश पाटील प्रतिष्ठान आणि वेलनेस फोरेव्हर केमिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ३१ मार्च रोजी ज्येष्ठ नागरिक वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त एका मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रम सकाळी ९.३० ते १२ यादरम्यान संपन्न होणार असून शिवप्रतिमा सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

रायगडचे पालकमंत्री व राज्यमंत्री रविन्द्र चव्हाण,उपमहापौर मोरेश्वर भोईर,तसेच पालिकेचे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल.सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ्य नागरिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन नगरसेविका डॉ.सुनीता पाटील यांनी केले आहे.

 

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email