महिलेचे सव्वा चार लाखांचे दागिने लांबवले
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१० – कल्याण पश्चिम मंगेशी सृष्टी मध्ये राहणाऱ्या सुवर्णा आमटे या इस्टेट एजंट असून काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहाड येथील साईट वर ग्राहकांना घर दाखवण्यासाठी गेल्या होत्या यावेळी त्यांनी आपली पर्स साई निर्वाणा कार्यलयातील काम करणाऱ्या एका महिलेकडे आपली पर्स ठेवली. यावेळी त्या ठिकाणी सुशील दुबे हा इसम होता. त्यांना पर्स ठेवताना पहिले आमटे जाताच त्याने या पर्स मधील सव्वा चार लाखंचे दागिने काढून घेतले. पुन्हा परतल्या नंतर त्यांना सदर प्रकार लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सुशील दुबे विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: