महिलेकडे लाखो रुपयांची खंडणी मागितली : त्रिकुटाला रंगेहात अटक

उल्हासनगर -दुरुस्तीला आलेल्या मोबाईलमधे दाम्पत्याची एक व्यक्तिगत क्लिप सापडली.या क्लिपचा वापर करत महिलेला धमकावत तिच्याकडे लाखो रुपयांची मागणी करणार्या त्रिकुटाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
याबद्दल अधिक वृत्त असे की,एका इसमाने आपल्याच मित्राकडे मोबाईल दुरुस्तीला टाकला होता .सदर फोनमधे या फोनधारक पति-पत्नीची एक व्यक्तिगत क्लिप सापडली.त्या क्लिपच्या आधरे इतर दोघाना बरोबर घेवुन त्याने या जोडप्याला बदनाम करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.रवि कुमार अशा बनावट नावाने फोन करून या जोडप्याकडे 20 लाख रुपये मागत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.महिलेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. तुझी हत्या करुन रस्ता अपघातात ठार झालीस असे दाखविन अशी धमकी महिलेला देण्यात आली.अखेर ५लाख रुपयांची रक्कम ठरली.परंतु या दाम्पत्याने या प्रकाराला भिक घालायची नाही असा निर्णय घेतला व पोलिसांत तक्रार नोंदवली.ठाणे खंडणी विरोधी पथकाने मोबाइल टॉवरच्या लोकेशनवरुन एका आरोपीला अटक केली.यानंतर खंडणीची रक्कम स्वीकारताना इतर दोन जणाना अटक करण्यात आली. प्रदीप मोरे (28), ऋषीकेश फुलोरे (22) आणि अविनाश शिंदे (20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दाम्पत्याने अविनाश शिंदेकडे मोबाईल दुरुस्तीला टाकला होता .सदर फोनमधे या फोनधारक पति-पत्नीची एक व्यक्तिगत क्लिप सापडली.ती त्याने ऋषीकेश फुलोरे याला पाठवली व फुलोरेने ती प्रदीप मोरेला पाठवली .यानंतर त्यांनी एकत्र येवून खंडणीची योजना बनवली.मोबाइल टॉवरच्या लोकेशनवरुन पोलिसांनी प्रदीप मोरेला मुंबईतुन अटक केली.यानातर अविनाश शिंदे व ऋषीकेश फुलोरे याना खंडणी घेण्यासाठी बोलवून रंगेहाथ अटक केली.यातील प्रदीप मोरे हा मुंबईचा तर इतर दोघे हे उल्हासनगरचे राहणारे आहेत.पोलिस उपनिरीक्षक एच ए ढोले व त्यांच्या टीमने सदर करवाई यशस्वी केली.

Hits: 10

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email