महिला दिनाच्या औचित्याने  एसआरव्ही ममता हॉस्पिटलच्या पुढाकारने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 

डोंबिवली- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने डोंबिवली येथील एसआरव्ही ममता हॉस्पिटलच्या पुढाकाराने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात महिलांना दैनंदिन जीवनात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींवर भर देण्यात आला.
भारतात गेल्या काही दशकात स्तनांचा कर्करोग होण्याचा वयामध्ये एक मोठा बदल दिसून आला आहे. पूर्वी ७०% रुग्ण या ५० वर्षे वयावरील असायच्या. आता ४८% रुग्ण या पन्नाशीच्या आतील असतात आणि ३० ते ५० या वयोगटातील रुग्णांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे सध्या लाखो महिलांसाठी ऑस्टिओपोरोसिस ही एक गंभीर समस्या होऊन राहिली आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि इंटरनॅशनल ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशनतर्फे (आयओएफ) जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जागतिक आरोग्य समस्यांमध्ये हृदयविकारांखालोखाल ऑस्टिओपोरोसिसचा क्रमांक लागतो.  याचा अर्थ हा की, दर तीन सेकंदांनी एक ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर होते आणि त्यापैकी २०० दशलक्ष महिला असतात. आकडेवारीनुसार पन्नाशीतील निम्म्या महिलांना आयुष्यात कधीतरी ऑस्टिओपोरोसिसशी संबंधित फ्रॅक्चरचा सामना करावा लागतो.
एसआरव्ही ममता हॉस्पिटलमधील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जयश्री बंकिरा म्हणाल्या, “सर्व महिलांना स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका असतो पण वृद्ध महिलांना तो अधिक असतो. ज्या महिलांच्या जवळच्या नातेवाईकांना स्तनांचा किंवा अंडाशयाचा कर्करोग असेल त्यांना हे कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. स्थूल आणि प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या आणि धुम्रपान करणाऱ्या महिलांनाही स्तनांचा कर्करोगा होण्याची अधिक शक्यता असते.
“स्तनांचे कर्करोग केवळ महिलांमध्येच नाही तर क्वचित प्रमाणात पुरुषांमध्येही आढळून येतात. स्तनांच्या कर्करुग्णांपैकी १% पुरुष असतात. वेळेवर निदान झाले तर वेळेवर उपचार करता येतात. पण भीती, अवघडलेपण आणि डॉक्टरांची भेट घेण्यास विलंब केल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.”, अशी पुष्टी डॉ. बंकिरा यांनी जोडली.
एसआरव्ही ममता हॉस्पिटलमधील अस्थिविकारतज्ज्ञ डॉ. मनन गुजराथी म्हणतात, “वयानुसार जेव्हा हाडे ठिसूळ होत जातात तेव्हा ऑस्टिओपोरोसिस होतो. जाळीदार रचनेमुळे फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते.”
“सुरुवातीला म्हणजे वयाच्या साठीनंतर मनगट फ्रॅक्चर होते, त्यानंतर पाठीचा कणा फ्रॅक्चर होतो आणि शेवटी पार्श्वभागातील हाडे फ्रॅक्चर होतात. आनंदाची बातमी ही की, तुम्ही असे होण्याला प्रतिबंध करू शकता. २०व्या वर्षापर्यंत हाडे चेतावस्थेत असतात आणि त्यांची वाढ होत असते. वयाच्या तीसाव्या वर्षापर्यंत हाडांची कमाल घनता साध्य झालेली असते. त्यानंतर अत्यंत हाडांचा अत्यंत कमी वेगात पण हळुहळू ऱ्हास होतो. रजोनिवृत्तीच्या कालावधीत महिलांमध्ये तर वयाच्या पन्नाशी-साठीनंतर पुरुषांमध्ये हा वेग वाढतो.”, अशी पुष्टी डॉ. गुजराथी यांनी जोडली.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email