महावितरण कोकण विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे यांच्या भ्रष्टाचार व गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
सतीश करपे हे महावितरणचे कोकण विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून 2017 पासून कार्यरत आहेत वास्तविकपणे शासनाच्या निर्णयानुसार हे पद आय.ए.एस. अधिकाऱ्यासाठी राखीव आहे.आणि डांगे यांची या ठिकाणी नियुक्तीसुद्धा झाली होती. तरीसुद्धा वाममार्गाने आणि शासनाची दिशाभूल करून हे पद मिळवन्यात आले आहे असा आरोप देवेंद्र फँन्स क्लब या संस्थेने केलेला आहे कर्पे यांनी मोठ्या प्रमाणात या पदाचा गैरवापर केला असून कर्पे यांच्या भ्रष्टाचाराची कल्पना ऊर्जामंत्री बावनकुळे यांना सुद्धा आहे असे देवेंद्र फँन्स क्लबचे म्हणणे आहे.सदर याबाबतीत राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिसेंबर 2015 मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झालेल्या जनता दरबारात त्यांची कानउघडणी केली होती.कर्पे यांच्या आदेशानुसार कर्जत येथे मुंढे मुख्य अभियंता यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने मद्यपानाची मैफिलही आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये पुणे व पनवेलवरून खास डांसर्स बोलावण्यात आल्या होत्या.कर्मचाऱ्यांना आरोप पत्र देणे व नंतर पैसे घेवुन कमी दंड लावणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे असाही आरोप सदर क्लबने केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून झालेल्या एका प्रकरणामध्ये महावितरणचे सेवाविनायम धाब्यावर ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी त्या कर्मचा-यांविरोधात कोणतीही कारवाई केली नाही तसेच त्यांच्यामुळे कोकण प्रदेशांतर्गत परिमंडळांमध्ये भ्रष्टाचार फोफावला आहे.करपे हे जून 2018 मध्ये सेवा निवृत्त होत आहेत म्हणून या तक्रारींंची जलद गतीने सेक्रेटरी लेवलवर चौकशी करावी आणि त्यांना देय असलेली देयके थांबवण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फँन्स क्लबने केली आहे.