महावितरणची “अभय’ योजना अनेक ग्राहकांना होणार लाभ
ज्या औद्योगिक ग्राहकांचा ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे अशा ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली असून याचा लाभ अनेक ग्राहकांना होणार असून योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांचे थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार दोन्ही माफ करण्यात येणार आहे.
ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना १०० टक्के व्याज व विलंब आकारण्यातून सवलत मिळणार आहे. १ जुलै २०१८ ते 31 ऑगस्ट २०१८ या दरम्यान ग्राहकाने मूळ थकबाकी आणि व्याजाची २५ टक्के रक्कम भरली तर उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची माफी मिळेल.
न्यायालयीन प्रकरणातील ग्राहकांनाही लाभ
जे न्यायालयीन प्रकरण १२ वर्षांपेक्षा अधिकचे असेल व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल तर संबंधित ग्राहकांनी ते एकाच वेळी भरल्यास त्या ग्राहकालाही १०० टक्के व्याजाची माफी मिळणार आहे. तसेच जे न्यायालयीन प्रकरण १२ वर्षांपर्यंतचे आहे आणि न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली आहे, अशा ग्राहकांनी एका टप्प्यात त्याचा भरणा केल्यास त्यांना ५० टक्के व्याजमाफीची सूट देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Please follow and like us: