महाराष्ट्र दिनी साकेत येथे ध्वजारोहण
ठाणे – महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार १ मे रोजी सकाळी ८ वाजता सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ होत आहे.पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे होणाऱ्या या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.मुख्य शासकीय समारंभास जास्तीत जास्त व्यक्तींना भाग घेता यावा यासाठी १ मे रोजी सकाळी ७.१५ ते ९ या दरम्यान ध्वजारोहणाचा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. तसा कार्यक्रम घ्यायचा असल्यास सकाळी ७.१५ पूर्वी किंवा ९ नंतरच करता येईल.
Please follow and like us: