महाराष्ट्रशासनाचा‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रम युवकांना संधी : विवेकशील समाज घडविण्यासाठी उचलले पाऊल

 

आकाश आनन्द 

मुंबई-राज्यशासनाने  आधुनिक युगातील वेगवान संपर्कसाधनांचा विधायक कार्यासाठी उपयोग करुनघेण्यासाठी आणि तरुणांना जास्तीतजास्त संधी देवून विवेकशील समाजघडविण्यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र उपक्रम’ राबविण्याचा निर्धार केला आहे.

आधुनिक काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी झाला आहे.बहुतांश युवक मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडिया आता मनोरंजनाचे साधन न राहता ज्ञान उपलब्ध करुन घेण्याचे प्रभावी साधन ठरले आहे. लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे. देशातील बहुतांश युवक फेसबुक, व्हॉट्ॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे शासनाने सोशल मीडियाची ताकद जाणून‘सोशलमीडिया महामित्र’ उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.याउपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातून दहा युवकांची सोशलमीडिया महामित्र म्हणून निवड केली जाणार आहे. त्यांना जिल्हास्तरावर समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चेसाठी पाचारण केले जाणार आहे. जिल्हास्तरावरील कार्यक्रम 5 ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलीसआयुक्त, पोलीसअधिक्षक, समाजातील प्रतिष्ठित यांच्या समवेतही गटचर्चा आयोजित करण्यात येईल.

चर्चेअंती प्रत्येक तालुक्यातून एका महामित्राची राज्यस्तरासाठी निवड केली जाणारआहे.

यासाठी 1 ते 18 फेब्रुवारीपर्यंत युवकांना नोंदणी करता येणार आहे.

याउपक्रमातील सर्व सहभागींना मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सहभागींना जिल्हास्तरीय मान्यवरांची भेटवस्तू, लोकराज्य वार्षिक वर्गणी, महाराष्ट्र वार्षिकी पुस्तक तसेच जिल्हाधिकारी किंवा मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे प्रशस्तीपत्र व फोटो.राज्यस्तरासाठी निवड झालेल्यांना मुंबईत जाण्यासाठी निमंत्रण, मान्यवरांसोबत सेल्फी, आपले विचार मांडण्याची संधी, मुख्यमंत्री यांचे सोबत फोटो, पारितोषिक व अन्य भेटवस्तू देण्यात येणार आहे. यासंधीचा अधिकाधिक युवकांनी लाभ घेऊन सोशल मीडिया महामित्र म्हणून पारितोषिक पटकावावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागातर्फे करण्यात आले आहे.

या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता Google Play store  अथवाApple च्याApp Store वर#MahaMitra हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे लागेल.

या ॲप्लीकेशनमध्ये नाव, वय, पत्ता हे तपशील देऊन नोंदणी करावयाची आहे. ही नोंदणी प्रक्रिया 1 फेब्रुवारी रोजी सुरु होणार असून 18 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15 वर्षावरील रहिवासी नि:शुल्क सहभागी होऊ शकेल.

समाज माध्यमांच्या सदुपयोगा बाबत 5 ते 17 मार्च दरम्यान गटचर्चा :-

राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर समाजमाध्यमांच्या सदुपयोगा बाबत 5 ते 17 मार्चच्या दरम्यान गटचर्चा होणार आहे. यात प्रत्येक तालुक्यातील 10 सोशल मीडिया महामित्र सहभागी होतील. यातून तालुक्यातील एकाची राज्यस्तरीय गटचर्चा होईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीसआयुक्त, पोलीस अधिक्षक यांच्या समवेत ही गटचर्चा आयोजित करण्यात येईल.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email