महामार्ग जॅम करू, शिवसेनेचा इशारा
शिवसेनेचे तालुका कार्यकारिणी सदस्य दत्ताशेठ ठाकरे यांनी केरळ पूरग्रस्तांना २१ हजारांची आर्थिक मदत केली. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगाव येथे झालेल्या अपघातातील दाम्पत्याच्या उपचाराची, खर्चाची आणि घरचे किराणा सामान देण्याची जबाबदारी शिवसेनाठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जि.प. अध्यक्षा मंजूषा जाधव आणि तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनी घेतली.
केरळमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे जीवित तसेच वित्तहानी झाली. या पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून दत्ताशेठ ठाकरे यांनी २१ हजारांची मदत दिली. त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या कामिनी आणि सचिन या भावंडांच्या आईवडिलांचा अपघात झाला. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जि.प. अध्यक्षा मंजूषा जाधव आणि तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनी रुग्णालयात भेट देऊन उपचाराची, खर्चाची तसेच किराणा सामान भरून देण्याची मदत म्हणून जबाबदारी स्वीकारल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.