महान क्रिकेटपटू हरपला – मुख्यमंत्री

मुंबई, दि.१८ – माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटमधील एक महान व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. वाडेकर यांनी खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवड समिती प्रमुख आणि क्रीडा संघटक अशा विविध भूमिकांतून भारतीय क्रिकेटला अतिशय मोलाचे योगदान दिले होते.

हेही वाचा :- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यासारख्या मातब्बर संघांना त्यांच्याच भूमीत प्रथमच नमविण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या वाडेकरांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात विजयाचा एक नवा अध्याय सुरू केला. आक्रमक फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या वाडेकरांनी मुंबई क्रिकेटच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. क्रिकेटशी असलेली आपली बांधिलकी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोपासली होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email