मलंगगडावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवाना राखी बांधून सामाजिक एकतेच घडविले दर्शन

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२७ – कल्याण जवळच्या मलंगगडावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून सामाजिक एकतेच दर्शन घडविले आहे. कल्याणपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मलंगगडावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. मलंगगडावर असलेला हिंदू व मुस्लिम धर्मातील तिढा न्यायालयात आहे. मात्र हे सर्व विसरून हिंदू-मुस्लिम भाविकांनी सामाजिक आणि धार्मिक एकोपा जोपासला आहे.

हेही वाचा :- रक्षाबंधनाच्या शुभदिनी एकाच वेळी चार सुंदर मुलींचा जन्म

एकीकडे दोन्ही धर्मीयांकडून एकतेच दर्शन घडवल्याने दोन्ही समाजामध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील भाविकांनी मध्यरात्री गडावर जाऊन नारळी भात आणि नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली. याच वेळी रक्षाबंधनसुद्धा साजरा करण्यात आला. रविवारी राखी पौर्णिमा होती. बहीण-भावाच्या अतूट नात्याची साक्ष देणारा हा सण आणि याच दिवशी या हिंदू-मुस्लिम बांधवांनी एका नव्या नात्याची आठवण सगळ्यांना करून दिली आहे.

हेही वाचा :- आज खरे तर बकरी ईद. मुस्लीम बांधवांचा सण. याच दिवशी मेंदू मृत झालेल्या मुस्लीम तरुणाचे अवयवदान

कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्यासोबत आहेत हे जाणवून देणारा हा दिवस मानला जातो. बहीण भावाच्या हाताला राखी बांधते आणि भाऊ आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. एकमेकांवरचा विश्वास, प्रेम हे सगळे या राखीच्या धाग्यात गुंफलेले असते. तसेच नाते हे प्रत्येकात असायला हवे. आपल्या माणूसकीची जातीय वाटणी न करता एकोप्याने रहा सांगणारा हा सण ठरला आहे. म्हणून काळ कितीही बदलला तरी राखी पौर्णिमेचे महत्त्व काही कमी होत नाही. श्रावणातल्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. हिंदू-मुस्लिम एकोप्याचे अर्थ दर्शन घडविणारा हा सण मलंगगडावर साजरा करण्यात आला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email