मराठी उद्योजकांच्या ठामपणे पाठीशी राहीन : राज ठाकरे

(म.विजय)

मुंबई – मराठी उद्योजकांनी आक्रमक पने व्यवसाय करणे गरजेचे आहे असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र बिजनेस क्लबमध्ये मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं.

उद्योगात जरूर मोठे व्हा परंतु जे कराल ते राज्यासाठी करा असं आवाहन सुद्धा राज ठाकरें यांनी मराठी उद्योजकांना केलं. पुढे राज ठाकरे यांनी उपस्थित होतकरू मराठी उद्योजकांना संबोधित करताना सांगितलं की, बाहेरून लोक आले ते व्यवसाय करत बसले आपले लोक नोकरी करत बसले आहेत.

महाराष्ट्रातील शहरांचे महत्व दुर्दैवाने मराठी लोकांना समजत नाहीयं अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रावरती मी एक डाॅक्युमेन्ट्री बनवतोय अशी माहिती सुद्धा राज ठाकरे यांनी उपस्थितांना दिली.

उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी खालील मुद्दे मांडले;

महानगर पालिकेत कंत्राटदार राजस्थान मधील एका गावातील आहेत.

महाराष्ट्र ही भुमी आपण समज़ुन घेतली पाहीजे.

बाहेरून लोक आले ते व्यवसाय करत बसले आपले लोक नोकरी करत बसले.

महाराष्ट्रात सर्व सोयीसुविधा असल्याने बाहेरून लोक व्यवसायासाठी आले.

बाहेरील लोकांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो.

महाराष्ट्रातील शहरांचे महत्व दुर्दैवाने मराठी लोकांना समजत नाहीयं.

शहरांमध्ये मराठी लोकसंख्या कमी होत आहे आणि बाहेरील लोकांची संख्या वाढत आहे.

मराठी माणसाला व्यवसायात आक्रमक व्हावे लागेल

महाबळेश्वर मध्ये ६०ते ७० % लोक हे गुजराती जातात.

आपल्या देशाच्या पंतप्रधानांना जर वाटत असेल की आपल्या राज्याचा विकास व्हवा त्यांच्या सतत मनात तेच असतं. सर्व गोष्टी गुजरात मध्येच. बुलेट ट्रेन गुजरात मध्येच का ? दुसरीकडे का नाही ?ठाणे जिल्ह्यात ७-८ महानगरपालिका आहेत ठाण्यात लोकसंख्या वाढत आहे. ही शहरं जर मराठी माणसाच्या हातातून गेली तर तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही.महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्थळांवर स्वःताचा ठसा उमटवा.

वेगवेगळ्या राज्याची भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे. भारतातील प्रत्येक राज्य हा एक देश आहे.महाराष्ट्रावरती मी एक डाॅक्युमेन्ट्री बनवतोय.सर्वकाही कोकणात असताना तिकडे चायनिज ची दुकाने आहेत, कोकणात काय असं कमी आहे की तिकडे चायनिज दुकाने लागतात.

महाराष्ट्रातील ८ भारत रत्नांपैकी ७ भारत रत्न ही कोकणपट्ट्यातील आहेत आणि या पैकी चार भारतरत्न ही दापोलीतील आहेत.

मराठी उद्योजकांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email