मराठा आरक्षणासाठी विड्याच्या तरुणाची आत्महत्या; मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा नकार

केज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केज तालुक्यातील विडा येथील अभिजीत देशमुख (वय ३५) या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली. आरक्षणासाठी आणि आजारीपणा, कर्जास कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिट्ठी त्याने लिहून ठेवली आहे. दरम्यान, उच्चशिक्षित अभिजीतच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत घ्यावे अन्यथा मृतदेह स्वीकारणार नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेली ही सातवी आत्महत्या आहे. अभिजीत देशमुख यांचा मराठा क्रांती मोर्चांमध्ये सक्रीय सहभाग होता. मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. ते रसायनशास्त्र विषयातील पदवीधर होते. शिक्षित असूनही नोकरी मिळत नसल्याने अभिजीत अस्वस्थ होते. आरक्षण नसल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बँकेचे कर्जही मिळत नसल्याची खंत ते अनेकदा व्यक्त करीत. मंगळवारी सकाळी त्यांनी घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशामध्ये चिट्ठी सापडली असून मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधांचा खर्च या कारणाने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख चिट्ठीमध्ये आहे.

कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची ग्रामस्थांची मागणी :

दरम्यान, अभिजीत यांच्या आत्महत्येची माहिती समजताच विडा गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळतशासनाप्रती निषेध व्यक्त केला. मयत अभिजीत यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा ग्रामस्थांनी इशारा ग्रामस्थांनी ग्राम पंचायतच्या लेटरहेड वरून निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email