मराठा आरक्षणासाठी तरुणाची नदीत उडी मारुन आत्महत्या

मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा जलसमाधी घेऊ, असे बोलत एका तरुणाने पुलावरुन नदीत उडी मारल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे या तरुणाचे नाव असून गंगापूर तालुक्यातील कानडगावात राहणारा काकासाहेब शिंदे हा तरुण मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाला होता. सोमवारी दुपारी कायगाव टोक येथील नदीवरील पुलावरुन त्याने उडी मारली. स्थानिक पोलिसांनी तातडीने काकासाहेब शिंदेला पाण्याबाहेर काढले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आंदोलकांनी जलसमाधीसारखे आंदोलन करु नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email