मराठा आरक्षणाची जनसुनावणी  शासकीय विश्रामगृहाऐवजी नियोजन भवनात

ठाणे दि 4: मराठा आरक्षणाच्या संदर्भात 8 मे रोजी होणारी जनसुनावणी शासकीय विश्रामगृहाऐवजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथील पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे.
आयोगाचे अध्यक्ष एम.जी.गायकवाड, सदस्य सुवर्णा रावळ, सुधीर ठाकरे व इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत 8 मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे होणाऱ्या जन सुनावणीत ठाणे व पालघर जिल्ह्यातील व्यक्ती, संस्था यांनी मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक  मागासलेपण याविषयी आपले काही म्हणणे किंवा सुचना मांडावयाच्या असल्यास दुपारी 11 ते 3 या वेळेत ऐतिहासिक दस्तावेज, पुरावे यासह उपस्थित राहावे असे सहायक आयुक्त समाजकल्याण उज्वला सकपाळे कळवितात.
कोकण भवन येथे देखील सर्व संबंधितानी 16 मे रोजी 11 ते 3 या वेळेत समक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे आयोगासमोर मांडावे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email