मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी

बीड दि.०४ – मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी गेल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये.. आरक्षण द्यावे एवढीच अंतिम इच्छा असल्याची चिठ्ठी लिहून त्यांनी आत्महत्या केली. शिवाजी तुकाराम काळे (४२) असे मयताचे नाव असून ते मुळचे पिंपळनेर (गणपती ता. बीड) येथील रहिवासी होते. कामानिमित्ताने ते गेल्या काही दिवसांपासून जवळच असलेल्या बेडूकवाडी शिवारातील शेतवस्तीवर

राहत होते. शुक्रवारी रात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या शर्टच्या खिशात चिट्टी आढळून आली असून त्यामध्ये, मराठा समाजासाठी आज दिनांत 3 रोजी मी माझे जीवन संपवीत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये. आरक्षण द्यावे एवढीच विनंती अशी चिठ्ठी लिहून त्यांनी आत्महत्या केली.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email