मनसे महिला कार्यकर्त्यांनी राम कदमांच्या पुतळ्याला मारले १०० जोडे

तुम्हाला एखादी मुलगी आवडली तिने तुम्हाला नकार दिला आणि जर तुमच्या घरच्यांना ती मुलगी पसंद असेल तर तिला उचलून आणू असे वादग्रस्त वक्तव्य राम कदम यांनी मुंबईतील घाटकोपर येथील दहीहांडी सोहळ्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधताना केले होते. दहीहांडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात शहर मनसे महिला सेनेकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अलका चौकात महिला कार्यकर्त्यांनी राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शंभर जोडे मारले. मनसे महिला सेनेच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठोबरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले

त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका होत आहे. मनसे महिला सेनेच्या वतीने अलका चौकात निदर्शने करण्यात आली. राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शंभर जोडे मारण्यात आले. यावेळी रुपाली पाटील- ठोबरे म्हणाल्या, राम कदमांना सत्तेचा माज आलेला आहे. त्यांना महिलांबद्दल कुठलाही आदर राहिलेला नाही. त्यांचं वक्तव्य हे महिलांचे अपमान करणारे आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शंभर जोडे मारले आहेत. राज राहेबांनी आम्हाला परवानगी दिली तर आमची एक महिला कार्यकर्ती घाटकोपरमध्ये जाऊन त्यांना स्त्री शक्ती दाखवून देईल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email