मनसे – भाजप नगरसेवक आयुक्तांसमोर भिडले..   

डोंबिवली – पालिका आयुक्त गोविंद बोडके हे बुधवारी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्यासमोर मनसे नगरसेवक मंदार हळबे आणि भाजप नगरसेवक राजन सामंत भिडले. हा प्रकार सुरु असताना यावेळी शिवसेनेचे  उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आणि मंगला सुळे यांनी पालिका आयुकतांना रस्त्याचे काम रखडल्याची माहिती दिली.  

  स्टेशनपरिसराची पाहणी केल्यानंतर पालिका आयुक्त बोडके यांनी पालिका अधिकाऱ्यांसह मानपाडा रोडची पाहणी केली. मानपाडा रोडवरील वाटावे बिल्डिंगसमोर असलेल्या पदपथाचे काम गेले अनेक महिन्यापासून रखडले आहे. यावेळी मनसे नगरसेवक मंदार हळबे हे आयुक्तांना रस्त्याची माहिती देत असताना भाजप नगतसेवक राजन सामंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आणि मंगला सुळे यांनी आयुक्तांना सदर रस्त्याचे काम रखडल्याचे संगीतले. यावेळी सामंत यांनी हळबे यांचे नाव घेत पदपथांच्या विकास कामात  अडथळा आणतात असा  आरोप केला. मात्र हळबे यांनी सामंत यांना राजकारण करू नका असे सांगितले. हा सर्व प्रकार आयुक्त बोडके शांतपणे पाहत होते. सदर रस्त्याबाबत माहिती घेतो असे सांगितले. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email