मध्य रेल्वे च्या वाहतुकीला महावितरणचा खोळंबा,महावितरण ची एच टी लाईन रेल्वे ओव्हर हेड वायर वर पडली

अहवाल तयार करत महावितरण विरोधात गुन्हा दखल करणार –रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – मध्य रेल्वेच्या आंबिवली वडवली रेल्वे ४७ गेट नजीक उल्हास नदीच्या पुलाजवळ महावितरणची उच्च दाबाची लाईन रेल्वे ओव्हरहेड वायरवर पडल्याने मध्य रेल्वे ची वाहतूक खोळंबली होती .महावितरणच्या पथकाने तत्काळ घटना स्थळी धाव घेत वायर बाहेर काढण्याचे काम हाती घेत तासाभरात हे काम पूर्ण केले व रेल्वे सेवा सुरळीत झाली .दरम्यान या घटने नंतर रेल्वे प्रशासनाने अहवाल तयार करत महावितरण विरोधात गुन्हा दखल करणार असल्याचे सांगितले .सुदैवाने यावेळी लोकल या रुळावर नसल्याने मोठा अनर्थ टळला .या घटनेमुळे महावितरण चा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हात्यावर आला असून अशा जीर्ण वाहिन्या बदलण्याची मागणी केली जात आहे .
      आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास आंबिवली वडवली रेल्वे ४७ गेट नजीक उल्हास नदीच्या पुलाजवळ खांब क्रमांक ५७-३५ (आयएसडी ) रेल्वे ओव्हरहेड वायरवरून जाणारी महावितरण ची उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटून रेल्वे ओव्हरहेड वायरवर पडल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली .घटनेची माहिती मिळताच महावितरण च्या पथकासह रेल्वे च्या अधिकारी कर्मचार्यांनी घटना स्थळी धाव घेतली .महावितरनच्या पथकाने तासाभराच्या अथक प्रयत्ना नंतर हि वायर काढली त्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाली .मात्र या घटनेनंतर तासभर मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती .याबाबत महावितरण चे अधिकारी जे यादव यांच्याशी संपर्क साधला  असतां त्यांनी 7 नंबर फिडर ची उच्चदाबाची विद्युत वहिनी तुटली होती ती रेल्वेच्या ओव्हरहेड वायर वर पडली हि वायर तत्काळ बाजूला करण्यात आली तसेच लवकरच हि वाहिनी भूमिगत करणार असल्याचे त्यांनी सांगितले .तर रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत अहवाल तयार करत महावितरण विरोधात गुन्हा दखल करणार असल्याचे सांगितले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email