मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकात धावत्या ट्रेनमधून एका तरुणीचा मोबाईल चोरानं तिला ढकल
मुंबई दि.२६ – मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकात धावत्या ट्रेनमधून एका तरुणीचा मोबाईल चोरुन तिला ढकल गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात या तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीयं. विशेष म्हणजे दिवसा ढवळ्या हा प्रकार घडलाय.
हेह वाचा :- गावठी दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल – डोंबिवलीती घटना
पीडित तरुणी महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून ठाणे रेल्वेस्थानकातून अंबरनाथच्या दिशेनं प्रवास करत होती. ही गाडी मुंब्रा स्थानकात येताच सोहल अन्सारी डब्यात चढला आणि त्यानं पीडित तरुणीचा ७० हजारांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. यावेळी झालेल्या झटापडीत पीडित तरुणीही गाडीतून पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी २४ तासांतच चोरट्याला अटक केलीये. त्याच्यावर यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. जखमी तरुणीवर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेमुळे रेल्वेत प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.