मंत्रालयासमोर पून्हा महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई – मंत्रालयासमोर एका महिलेने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडालीय. सखूबाई विठ्ठल झाल्टे असे त्या महिलेचे नाव आहे. गेल्या महिनाभरापासून ही पाचवी घटना आहे. मंत्रालयाच्या समोर विधान भवनाकडे एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न केला. सोबत त्या महिलेचा मुलगा होता. त्या महिलेनी हे कृत्य का केले, याचे कारण कळू शकलेले नाही. सोबत एक महिला पोलीस आहे. पोलीसांनी त्या महिलेला सेन्ट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे.
Please follow and like us: