भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरण ;एकनाथ खडसेंना दिलासा

मुंबई :०१ मे पुण्यातील  भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना एसीबीने क्लिनचीट दिली आहे. एसीबीच्या रिपोर्टमध्ये खडसेंना दिलासा मिळाला आहे.महसूल मंत्री असताना पदाचा गैरवापर करुन नातेवाईकांना फायदा दिल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर होता.

भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर ५२ मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी७५ लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करुन स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी३७ लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं.

महसूल मंत्री असताना पदाचा गैरवापर करुन नातेवाईकांना फायदा दिल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर होता. या वादामुळे त्यांना आपल्या पदावरूनही पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे गेले काही दिवस खडसे बॅकफूटवर गेलेले पाहायला मिळाले. पण खडसेंकडुन पदाचा दुरूपयोग न झाल्याचे एसीबीकडून स्पष्ट झाले आहे.

एसीबीने या प्रकरणाचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला. जमीन खरेदी प्रकरणात खडसेंमुळे सरकारचं नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, असा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. आता पुढील कारवाई कोर्टाच्या आदेशाने होणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email