भोगवाटा प्रमाणपत्र व मान्यता नसताना देसाई ईग्रजी शाळा सुरू ; विद्यार्थ्याचे नुकसान होणार ?

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – येथील नामांकित मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यांनीही ईग्रजी माध्यम सुरू केले आहे मात्र पेंढारकर महाविद्यालयाच्या आवारात ‘प्रभाकर देसाई इन्टर नेशनल इंग्रजी शाळा ‘ असून या शाळेत अवघे 200 विद्यार्थी आहेत शिक्षण विभागाने मान्यता दिली नसताना व भोगवटा (वापर परवाना )नसताना राजकीय दडपणाने ही शाळा सुरू असून यामुळे विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात आहे. 
2012 मध्ये डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ व श्री एज्युकेशन ट्रस्ट यांच्यात लेखी करार होऊन अटी व शर्तीवर ट्रस्टला 25 वर्षे शाळा चालवण्यास देण्यात आली मात्र ट्रस्ट अटी शर्ती पाळत नाही असा ठपका ठेवून मंडळाने 2015 मध्ये करार रद्द केला तरीही ट्रस्ट ताबा सोडण्यास तयार नाही व नियमबाह्य पद्धतीने शाळा सुरू ठेवली असून मंडळाने मुबई उच्य न्यायालयात दाद मागितली आहे 
कोणतीही इमारत बांधून झाल्यावर तिला भोगवाटा (वापर परवाना )घेणे बंधनकारक आहेमात्र ट्रस्टने त्या शिवाय शाळा सुरू ठेवली आहे त्याच बरोबर शिक्षण विभागाने मान्यताही दिली नसल्याने परीक्षेसाठी विद्यार्थी इतर शाळेत पाठवले जातात वापर परवण्याशिवाय इमारत वापरत असताना जर काही दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात डोंबिवली औद्योगिक विकास मंडळाच्या कार्यालयात चौकशी केली असता वापर परवाना नसताना वापर करणे योग्य नाही असे मान्य करण्यात आले मात्र राजकीय दबावामुळे अधिकारी काही करत नाहीत असे सांगण्यात आले 
विभागीय उपशिक्षणादिकारी यांनी मध्यतरी चौकशी केली असता शाळेला उपशिक्षणाधिकारी यांचेकडून परवानगी घेण्यात आली नाही असा अभिप्राय मारण्यात आला असून डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ व श्री एज्युकेशन ट्रस्ट यांच्यात एकवाक्यता व सुसूत्रता नसल्याचा अभिप्राय मारण्यात आल्याचे सांगण्यात आले 
विद्या राम गोपाल(मुखयअध्यापिका )
शाळेला मान्यता घेण्याची जबाबदारी मंडळाची असून जागा व शाळा त्यांंची आहे या बाबत अनेकदा कळवण्यात आले आहे. 
प्रभाकर देसाई (अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ )
वापर परवाना नाही हे मान्य आहे मात्र हे प्रकरण मुंंबई उच्य न्यायालयात असल्याने बोलणे उचित नाही. 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email