भूल थापा देत विद्यार्थ्यांची चैन लंपास ; पुन्हा एका विद्यार्थ्यांला लुबडल्याची घटना
कल्याण- काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम परिसरात एका विद्यार्थ्यांला भूलथापा देत त्याची सोन्याची चैन लंपास केल्याची घटना घडली होती .पुन्हा एका विद्यार्थ्यांला लुबडल्याची घटना उघड झाली आहे .
कल्याण पश्चिमेकडील बेतूरकर पाडा ,जुना मनीषा नगर चव्हाण चाळीत रहाणारे साइराज शिवळकर 17 हा विद्यार्थी काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कॉलेज वरून घरी परतत होता .फडके मैदान परिसरात पोचताच एका इसमाने त्याला हटकले या इसमाने तुमच्या कॉलेज च्या मुलांनी मिळून एका मुलीस मारहाण केली आहे .त्यामध्ये तुझ्या सारखे शर्ट घातलेला मुलगा होता अशी थाप देत बहाणा देत हात चलाखीने साइराज च्या गळ्यातील 26 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन हिसकावून तेथून पळ काढला .आपली फसवणूक झाल्याचे लक्षत आल्या नंतर साइराज ने या प्रकरणी बाजारपेठ पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे .
Please follow and like us: