भूलथापा देवून वृद्धमहिलेची चैन व रोकड लंपास
डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोड येथील क्लोसिक बिल्डींगमधील रहिवासी संपती पाटील काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भाजी खरेदी करण्यासाठी कोपर रोड ने पायी जात होत्या .यावेळी दोन अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले त्यांनी प्रकाश शेठ ला सहा मुली नंतर एक मुलगा झाला आहे ते गरीब महिलांना बाराशे रुपये वाटत आहेत असे आमिष दाखवले व पाटील यांना भरत मैदान येथील एका इमारती जवळ घेवून गेले .तेथे त्यांना परत तुम्ही गरीब वाटत नाही तुम्हाला पैसे मिलणार नाही म्हणून तुम्ही चैन पैसे एका पिशवीत ठेवा असे सांगत या महिलेला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने पैसे चैन काढून घेतली व शेठची पत्नी येईल असे सांगत तेथून पळून गेले बराच कालावधी लोटला मात्र कुणी आले नसल्याने या महिलेने पिशवी उघडून बघितली तरी त्यांना चैन व रोकड ब आढळल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात दुकली विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे .
Hits: 26