भूलथापा देत वृद्ध महिलेचे दागिने केले लंपास
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०६ – डोंबिवली पूर्वेकडील पांडुरंग वाडी शांती नगर येथील आदित्य हाईटस मध्ये राहणाऱ्या सुनंदा देसाई ६८ या वृद्ध महिला काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास याच परिसरातून पायी चालत असतांना दोन अज्ञात इसमांनी त्यांना हटकले. या दोघांनी शेठच्या मुलाचा वाढदिवस असल्याने शेठ साड्या व पैसे वाटत आहेत. अशी भूलथाप देत त्यांना बोलण्यात गुंतवून या महिले जवळील सोन्याची माळ व अंगठी असे एकूण ४० हजार रुपये किमतीचे दागिने पाकिटात ठेवण्यास सांगत मोठ्या हात चलाखीने या महिलेचे लक्ष विचलित करून त्याचे दागिने घेवून हे चोरटे पसार झाले. या प्रकरणी देसाई यांनी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात दोन भामट्या विरोधात गुन्हे दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.
Please follow and like us: