भुशी डॅम मध्ये सेल्फी काढण्यास पाण्यात उतरलेल्या तीन पैैकी एकाचा मृत्यु

पुणे – भुशी डॅम मध्ये पाण्यात उतरून तीन तरुण सेल्फी काढण्यास गेले होते. परंतु, त्यातील एक तरुण गाळात रुतला आणि पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यु जाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली असून तिरुपती असे मृतकाचे नाव असून पत्नी काही दिवसांसाठी गावी गेली होती. त्यामुळे घरात तो एकटाच होता. मौजमजा करण्यासाठी तो सहा मित्रांसमवेत लोणावळ्याच्या भुशी डॅम येथे गेला. थट्टा मस्करी सुरू होती. सहा मित्रांपैकी तिघांना पोहता येत नसल्याने ते बाहेर थांबले. तिरुपती आणि त्याचे मित्र पाण्यात उतरत पोहत असताना त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. खोल पाण्यात जात असताना तिरुपती गाळात रुतला. त्याची हालचाल होत नव्हती. मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पाण्यात बुडाला. दरम्यान, मृत तिरुपती उलवाड हा त्याच्या पत्नी समवेत काळेवाडी येथे राहतो. बुडालेल्या तरुणाचे सायंकाळी सातच्या सुमारास मृतदेह मिळाला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email