भुरट्या चोरट्यांचा उपद्रव वाढला,लक्ष विचलित करत महिलांच्या पर्स मध्ये ऐवज लंपास
डोंबिवली – कल्याण डोंबिवली मध्ये भुरट्या चोरट्यांचा उपद्रव वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत . डोंबिवली पूर्वेकडील मारुती महादेव नगर मध्ये राहणारी महिला काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील म्हैसूर मेडिकल जवळ मोबाईल कव्हर खरेदी करत असतांना अज्ञात चोरट्याने त्या खरेदीत मग्न असल्याची संधी साधत त्याच्या पर्स मधील मोबाईल लंपास केला तर त्याच्या शेजारी असलेली महिला सिमरन कौर या महिलेच्या पर्स मधील रोख रक्कम व एटीएम कार्ड लंपास केले .काही वेळाने त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे.
Please follow and like us: