भिवंडीत मानवी कवटी, हाडे सापडल्याने खळबळ

भिवंडी – तालुक्यातील शेलारगाव परिसरात असलेल्या जंगल परिसरात मानवी कवटी व हाडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही हाडे मीठपाडा येथून बेपत्ता असलेल्या भरत लक्ष्मण कांबळे (४९) यांची असावित असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शेलारगाव परिसरातील मीठपाडा येथील संतोष वारघडे हे शेतकरी बकरी चारण्यासाठी शेलारगावालगतच्या जंगलात गेले होते. यावेळी त्यांना मानवी कवटी व हाडे नजरेस पडली. तात्काळ त्यांनी याची माहिती भिवंडी तालुका पोलीस ठाण्यास दिली. त्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले, एपीआय राजीव पाटील, पोउनि मोतिराम पवार, वैभव देशपांडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पंचनाम्यानंतर कवटी व हाडे ताब्यात घेवून ती न्यायवैद्यक अहवालासाठी मुंबईच्या कलिना येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत.
पोलिसांना घटनास्थळी एक अर्धवट जळालेले पाकीट सापडले असून त्यात भरत कांबळे नावाने सिराज हॉस्पिटलचे ओळखपत्र सापडले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता, ते मीठपाडा येथील रहिवासी असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी कांबळे कुटुंबीयांशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली. 
पत्नी छाया भरत कांबळे व तीन मुलींनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून बेपत्ता लक्ष्मण कांबळे यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. कांबळे हे सिराज हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून कामाला होते. ते २० जानेवारीपासून बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या पत्नीने शांतीनगर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या घटनेची नोंद घेवून भरत यांच्या मृत्यूच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. अधिक तपास वपोनि विजय चौगुले करीत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email